राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरातील मुख्यालय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाच्या (पीएफआय) निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर कारवाई केली होती. त्यानंतर सुरू असलेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात ही माहिती पुढे आली आहे.
तपासात पुढे आली धक्कादायक माहिती
याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने सुरू केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसेच भाजपचे नेतेही पीएफआयच्या रडारवर असल्याचे उघड झाले आहे. तसेच पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाची सर्व माहितीही गोळा करण्यात आली होती. दसऱ्या दिवशी आरएसएसच्या कार्यालयात कार्यक्रम होतो याबाबत सर्व माहिती गोळा केली होती. तसेच भाजपच्या जेष्ठ नेत्यांची माहितीही एकत्र करण्यात आली होती.
(हेही वाचा – साईसंस्थान विश्वस्त मंडळाला दिलासा नाहीच, त्रिसदस्यीय समितीच पाहणार संस्थानाचं कामकाज)
याबाबतची सर्व माहिती आणि तपास पुढे सुरू आहेत. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्यांना आज, सोमवारी न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे. या कारवाईनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विश्व हिंदू परिषद, आरएसएस संबधित मोठे व्यक्ती याबद्दलची आणखी काही माहिती त्यांची नावे इतर काही माहिती मिळते का याबाबतची चौकशी सुरू आहे.
Join Our WhatsApp Community