व्हॉट्सअॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. युजर्सला नवीन सुविधा मिळाव्यात यासाठी व्हॉट्सअॅप दररोज नवनवे फिचर्स लॉंच करत असते. अलिकडेच ग्रुप लेफ्ट, वन व्हू इमेज असे फिचर्स व्हॉट्सअॅपने सेवेत आणले होते. आता व्हॉट्सअॅप बिझनेज युजर्ससाठी सुद्धा नवे अपडेट येत आहेत. व्हॉट्सअॅप नवीन अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस सादर करणार आहे. व्हॉट्सअॅपवर लवकरच Do Not Disturb मिस्ड कॉल अलर्ट हे अॅप्लिकेशन इंटरफेस येणार आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर आलेल्या कॉलची युजरला माहिती मिळेल.
( हेही वाचा : ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ हवाय? तिकीट आरक्षण करताना हा पर्याय नक्की निवडा )
डू नॉट डिस्टर्ब मोड
WABetsInfo यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपडेट रोलआऊट होण्यासाठी वेळ लागू शकतो. या नव्या अपडेटनंतर युजर्सला डू नॉट डिस्टर्ब हा मोड चालू केल्यानंतर सुद्धा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या कॉलची माहिती मिळेल. ही सुविधा सध्या iOS वर सुरू आहे लवकरच ही सुविधा Android युजरसाठी सुरू करण्यात येईल.
व्हॉट्सअॅप बऱ्याच दिवसांपासून अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. यामध्ये एडिट टॅब, पोल, व्हॉइस स्टेटस यांसारख्या अपडेटचा समावेश आहे. याशिवाय आता व्हॉट्सअॅप लवकरच युजर्सला स्वत:चा अवतार क्रिएट करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community