पीएफआयशी संबंधित इसमाच्या एसटीएफने आवळल्या मुसक्या

170

पीएफआयशी संबंधित विविध ठिकाणांवर एनआयएच्या माध्यमातून छापेमारी सुरू आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशविघातक कृत्य करणा-यांची धरपकड करण्यात येत आहे. लखनऊ विभूतीखंड बसस्थानकावरून अटक करण्यात आलेला अब्दुल मजीद शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफन पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून पीएफआय आणि दहशतवादी संघटना इसिसशी संबंधित अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. मुस्लिम तरुणांना भडकावून तो पीएफआयचे जाळे वाढवत होता. या प्रकरणी एटीएस आणि सुरक्षा एजन्सी त्यांच्या स्तरावरून तपास करत आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

(हेही वाचाः ब्रिटनमध्ये मंदिरांवर व हिंदूंवर होणारे जिहादी हल्ले थांबवा, विश्व हिंदू परिषदेची मागणी)

एसटीएफने आवळल्या मुसक्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपास यंत्रणा आणि एटीएस पीएफआयशी संबंधित लोकांवर सतत नकळत कडक कारवाई करत आहेत. या कारवाईनंतर संघटनेशी संबंधित असलेले लोक आता शहर सोडून पळून जात आहेत. तसाच 25 सप्टेंबरच्या रात्री विभूतीखंड बसस्थानकाजवळून माजीद पळून जात होता. एटीएसने त्याला दीड वर्षांपूर्वी अटक केली होती, सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचा दावा केला जात आहे. तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासात तो पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष वसीम अहमद यांचा मित्र असल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी मोदयागंज येथून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद बेगच्या अन्य तीन साथीदारांच्या शोधात पथके छापेमारी करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.