सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? तर सावधान

161

सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे मोबाइल चार्ज केल्यानंतर हैदराबादमधील एका कंपनीच्या सीईओच्या खात्यातून तब्बल 16 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ओडिशा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाइल फोन चार्जिंग करु नका, असे आवाहन केले आहे. तुमच्यासोबतही असा प्रकार होऊ शकतो. वेळेआधीच सावध होत अशा घटना टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ.

ज्यूस जॅकिंग किती धोकादायक?

हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॅंड किंवा माॅल अशा सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणा-या यूएसबी चार्जिंग पोर्टद्वारे गुन्हेगार कोणत्याही मोबाइल, लॅपटाॅप, टॅब्लेट, किंवा अन्य उपकरणात मालवेअर बसवून वैयक्तिक डेटा चोरतात. या प्रक्रियेला ज्यूस जॅकिंग म्हणतात.

( हेही वाचा: लव्ह जिहाद: मुसलमानांचे रितीरिवाज पाळण्यास विरोध केल्याने हिंदू मुलीची हत्या )

कशी होते चोरी ?

  • चार्जिंग पाॅइंट दोन प्रकारचे असतात.
  • एक एसी पाॅवर साॅकेट आणि यूएसबी चार्जिंग पाॅइंट.
  • यूएसबी चार्जिंग पाॅइंटमध्ये थेट यूएसबी केबल लावून मोबाइल चार्ज करता येतो.
  • यात यूएसबीतून डेटाही ट्रान्सफर होतो. यातून डेटा चोरीही होऊ शकतो.
  • जेव्हा आपण यापासून मोबाइल चार्ज करत असतो त्यावेळी मोबाइलमधून डेटा हॅकर्सकडे थेट ट्रान्सफर होतो.
  • यात आपल्या बॅंक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

लक्षात ठेवा

एसी पाॅवर साॅकेटद्वारे डेटा ट्रान्सफर किंवा चोरीची समस्या नाही. चार्जद्वारे तुमच्या मोबाइलसोबत डेटा कम्युनिकेशन करता येत नाही, मात्र थेट यूएसबी ते यूएसबीद्वारे डेटा ट्रान्सफर करता येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.