भाजपा नेत्या पंकजा मुंडे आक्रमक शैलीच्या वक्तव्याने अनेकदा वादात सापडत असतात, असेच पंकजा मुंडे यांचे एक वक्तव्य त्यांच्याच पक्षात अडचणी निर्माण करण्यास कारणीभूत ठरणार आहे. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मला संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे
काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि म्हणाल्या ‘मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनावर राज्य केले. समाजातील “बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद” या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. असे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा धक्का, पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच)
Join Our WhatsApp Community