गहलोत सुटले पण त्यांचे समर्थक अडकले, हायकमांडकडे कारवाईची मागणी

121

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता या चर्चांवर पडदा पडताना दिसत आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यासाठी गहलोत समर्थकांकडून विरोध करण्यात येत होता. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यासाठी पर्यवेक्षकांना राजस्थानमध्ये पाठवण्यात आले होते. या पर्यवेक्षकांनी सोनिया गांधी यांना सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना क्लिन चीट दिली असून, त्यांना समर्थन देणा-या नेत्यांवर मात्र कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोनिया गांधींना रिपोर्ट सादर

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्यामुळे राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राजीनामा देणार होते. त्यामुळे त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती. पण गहलोत समर्थक पायलट यांच्यावर नाराज असल्यामुळे सोमवारी या समर्थक आमदारांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजस्थानमधील काँग्रेस सरकार धोक्यात आले होते. गहलोत हे पक्षातून बंड करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.

(हेही वाचाः बाळासाहेब ठाकरेंचा नातूच आहे शिंदे गटातील वकिलांच्या फौजेत, निवडणूक आयोगातही लढणार)

त्यामुळे याबाबत माहिती घेण्यासाठी दिल्लीहून अजय माकण आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवण्यात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास गहलोत समर्थकांनी नकार दिला. याबाबतचा रिपोर्ट सोनिया गांधी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

गहलोत समर्थकांची मवाळ भूमिका

गहलोत यांनी हे बंड केले नसून ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सोनिया गांधी यांनी कठोर शब्दांत कानउघडणी केल्यामुळे गहलोत समर्थक आमदारांनीही पायलट यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकीय वादळ आता शमलं असल्याचं बोललं जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.