दरवर्षी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे 27 सप्टेंबर, 2022 या जागतिक पर्यटन दिनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना काळात दोन वर्ष हे पुरस्कार दिले नव्हते. त्यामुळे सन 2018-19 या वर्षाकरीताचे पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी तसेच पर्यटन सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्विकारला तसेच सदरचे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार हे हॉटेल, वाहतूक, गाईड, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणीत काम करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक संस्थांना दिले जातात. महाराष्ट्रातील खालील संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे.
1.पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट राज्य दुसरा क्रमांक
2.नागरी सुविधा (ब श्रेणी)- पाचगणी नगर परिषद (सातारा)
3.ताजमहाल पॅलेस 5 तारांकीत डिलक्स, मुंबई
4.वेलनेस पर्यटन- आत्ममंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी (पुणे)
5.ग्रामीण पर्यटन, सगुणाबाग (नेरळ), श्री. चंदन भडसावळे
6.जबाबदार पर्यटन- वेस्टर्न रुट्स्, पुणे
7.गीते ट्रॅव्हल्स- श्री. मनमोहन गोयल
8.वाहतूक (श्रेणी-1)- ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लि.
9.होमस्टे- दाला रुस्तर (पाचगणी) – कॅप्टन विकास गोखले
सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार प्राप्त झालेबाबत सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर म्हणाले या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व ऊर्जा मिळणार आहे. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकींचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल.
Join Our WhatsApp Community