भारतीय रेल्वेने देशातील 497 रेल्वे स्थानकांवर दिव्यांगांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुगम्य भारत अभियांनांतर्गत या स्थानकांवर दिव्यांगांसाठी उद्वाहने (लिफ्ट) आणि सरकते जिने (एस्केलेटर) बसवण्यात आले आहेत. यासोबतच इतर स्थानकांवरही सुविधांची निर्मिती सुरू आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत)
सरकते जिने (एस्केलेटर):- रेल्वेच्या धोरणानुसार, राजधानीतील शहरांमध्ये, 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये किंवा दररोज 25 हजारांहून अधिक लोकांची वर्दळ असलेल्या स्थानकांवर एस्केलेटर बसवले आहेत. ऑगस्ट 2022 पर्यंत, 339 स्थानकांवर 1090 एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. तसेच ऑगस्ट 2022 पर्यंत 400 स्थानकांवर 981 लिफ्ट्स बसविण्यात आल्या आहेत.
विविध स्थानकांवरील प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर एस्केलेटर आणि लिफ्टची तरतूद करणे हा त्याचाच एक भाग आहे आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही एक गरज आहे. प्रवाशांची सुरक्षितता सुधारण्यासाठी उचलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Join Our WhatsApp Community