मद्य धोरण घोटाळ्यातील पहिल्या आरोपीला सीबीआयकडून अटक!

152

दिल्लीतील मद्य धोरणांवरुन काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया वादाच्या भोव-यात अडकले होते. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असतानाच आता दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने पहिली अटक केली आहे. इंटरटेनमेंट, इव्हेंट मीडिया कंपनीचे माजी सीईओ विजय नायर याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा: मोठी बातमी: केंद्र सरकारने PFI वर घातली पाच वर्षांची बंदी )

मद्य धोरणातील घोटाळ्यामुळे ईडीकडून विजय नायरच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले होते. विजय नायर हा उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याप्रमाणे विजय नायर हा पाचव्या क्रमांकाचा आरोपी आहे.

याच मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर, भाजपवर आम आदमी पार्टीने अनेक आरोप केले होते.

कोण आहे विजय नायर

विजय नायर 2014 पासून ‘आप’ शी संबंधित आहे. पक्षासाठी निधी उभारण्याचे कामही तो करत होता. विजय नायर याच्याकडे आप पक्षाची मीडिया आणि संवाद राखण्याची रणनीती आखण्याचे कामही त्याच्याकडेच होते. त्यामुळे विजय नायर हा आपचे ज्येष्ठ नेते तसेच मनिष सिसोदिया यांच्या जवळचा मानला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.