‘पीएफआय’ वर बंदी हा अंतर्गत दहशतवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’

२८ सप्टेंबर २०१६ याच दिवशी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता.

136

‘पीएफआय’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे. मुसलमान युवकांचा बुद्धिभेद करून ‘पीएफआय’ने देशभरात हिंदू युवतींचे अपहरण करून ‘लव्ह जिहाद’, हिंदू नेत्यांच्या हत्या, हिंदूविरोधी दंगली आदींचे षड्यंत्र रचत अनेक आतंकवादी कृत्ये केली. वर्ष २०४७ मध्ये भारताला ‘इस्लामिक स्टेट’ करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी देशहिताच्या ‘सीएए’, ‘एनआरसी’ या कायद्यांना हिंसक पद्धतीने विरोध केला. एकूणच भारताचे इस्लामीकरण करण्याचे ध्येय बाळगणार्‍या या आतंकवादी चळवळीला आज प्रतिबंध बसला आहे, असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी दिली.

वर्ष २०१६ मध्ये २९ सप्टेंबर यादिवशी पंतप्रधान मोदींनी देशाबाहेरील आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, आज बरोबर सहा वर्षांनी देशांतर्गत आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी दिली आहे. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करणार्‍या मोदी सरकारच्या धाडसी निर्णयाचे सनातन संस्था स्वागत करते, असेही राजहंस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा ‘भारत जोडो’मध्ये सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्यात सहकार्य करू; काँग्रेसचा ‘उद्धवसेने’ला प्रस्ताव)

‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणावी

केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातली, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्ये, तसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. हिंदु जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलने, निवेदने, सोशल मिडीया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. देशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहे. आता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.