नव्या नियमानुसार, LPG ग्राहकांना आता वर्षभरात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्राहकांना एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता येणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता आलेल्या नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.
म्हणून घेण्यात आला निर्णय
घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या साॅफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. अनुदानित घरगुती गॅसचे रिफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून महान असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅसेस रिफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्याने घरगुती एलपीजी सिलेंडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
( हेही वाचा: महापालिका कर्मचारी म्हणतात, सानुग्रह अनुदान द्या, पण त्यातून आयकर कापून घेऊ नका! )
आता केवळ 12 अनुदानित सिलेंडर मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, तिनही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त 12 सिलेंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागतील.
Join Our WhatsApp Community