टी-२० विश्वचषकाला आता अवघे काही दिवस उरले असतानाचं भारतीय संघाला सर्वात मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. १६ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे.
( हेही वाचा : रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला! ५ किलोमीटर प्रवासासाठी मोजावे लागणार ९३ रुपये; जाणून घ्या नवे दर)
दुखापतीमुळे विश्रांती
दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आशिया कप खेळला नव्हता यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कमबॅक केले होते. बुमराहने २५ सप्टेंबरच्या सामन्यात ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या. टी-२० मधील ही त्याची सर्वात वाईट कामगिरी होती, दुखापतीमुळे बुमराहला चार आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या सोबत आहे. बुमराहच्या जागी टी-२० वर्ल्डकप संघात अन्य खेडाळूची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याआधी रविंद्र जडेचा सुद्धा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.
बुमराहच्या अनुपस्थितीत आशिया कपमध्ये भारताला फटका बसला होता. भारताला अंतिम फेरीत सुद्धा पोहोचता आले नव्हते, आता पुन्हा एकदा बुमराह संघाबाहेर असल्याने भारतीय संघासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर – मेलबर्न
- भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ – २७ ऑक्टोबर – सिडनी
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ३० ऑक्टोबर – पर्थ
- भारत विरुद्ध बांगलादेश – २ नोव्हेंबर – एडिलेड ओव्हल