भाजपचा राष्ट्रवादीला थेट बारामतीत दणका, या नेत्याने केला पक्ष प्रवेश

156

राज्यात एकीकडे शिंदे गटात उद्धव ठाकरे गटाकडून इनकमिंग सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते हे भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे दिसत आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतच भाजपने पवारांना धक्का दिला आहे. बारामतीतील राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला याचा फटका बसू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

बारामतीत भाजपमध्ये इनकमिंग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ.अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून कमळ हाती घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा प्रवेश झाला आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून ओबीसी समाजाला भाजपने न्याय मिळवून दिला आहे, असे अर्चना पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचाः एक नेता, एक पक्ष,एक विचार, एक लव्य,एक नाथ आणि बाळासाहेबांचा आवाज, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज)

कोण आहेत अर्चना पाटील?

अर्चना पाटील यांची इंदापूरसह बारामती तालुक्यातील ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती,इंदापूर,दौंड,पुरंदर,भोर,वेल्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या चांगल्याच सक्रीय आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा निरीक्षकपदी अर्चना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.