एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना बाजूला घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गटात अनेक जणांनी प्रवेश केला आहे. अजूनही हे सत्र सुरुच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे गटाला एकनिष्ठ असल्याचे ज्यांनी प्रमाणपत्र दिले, तेच आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. रामदास कदम यांच्या रत्नागिरीतील दौ-यानंतर या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही चिंता वाढवणारी बातमी असल्याचे बोलले जात आहे.
तसेच, गुहागरमधील ठाकरे गटातील 6 पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गुहागरमधील ठाकरे गटाचे चार पदाधिकारी आणि दोन सरपंच यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवासेना प्रमुख अमरदिप परचूरे, युवासेना तालुकाप्रमुख सुमेध सुर्वे, युवासेना आंबलोली शाखा प्रमुख, मंढरेचे सरपंच सुशिल आंग्रे, मासूचे सरपंच प्रकाश भोजने यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा फोटोदेखील समोर आला आहे.
( हेही वाचा: शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या )
Join Our WhatsApp Community