दिग्विजय सिंह यांचीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार! म्हणाले, हा नेता समोर असेल तर…

128

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सध्या नाट्यमय होत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार समजल्या जाणा-या अशोक गहलोत यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घेतल्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनी देखील त्यांचाच कित्ता गिरवला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असताना दिग्विजय सिंह यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे.

दिग्विजय सिंह यांची माघार

गुरुवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर दिग्विजय सिंह आणि शशी थरुर यांच्यात चुरस होणार हे स्पष्ट झाले होते. पण शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एंट्री केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी देखील निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे.

(हेही वाचाः ‘मी ट्रेनिंगला कधी येऊ? मोफत शिकवणार की फी घेणार?’, अजित दादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न)

जर खर्गे ही निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्याविरोधात कधीच निवडणूक लढवू शकत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांना पाठिंबा देखील देखील दर्शवला आहे., असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

खर्गे विरुद्ध थरुर

शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून शशी थरुर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत थरुर विरुद्ध खर्गे असा सामना रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.