सुप्रियाताईंची स्मरणशक्ती वाढण्यासाठी लागणारे ‘टॉनिक’ आम्ही लवकरच पाठवू; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

181
राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया सुळे अजून पचवू शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही कमी झालेली दिसते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू, असे प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी दिले. गेल्या दीड-दोन महिन्यांत महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली, असे वक्तव्य करणाऱ्या सुप्रियाताईंचा म्हस्के यांनी खास शैलीत समाचार घेतला.
राज्याचा गृहमंत्री भष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड झाला. मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहीमशी लागेबांधे असल्याच्या मुद्यावरुन एका मंत्र्याच्या हातात बेड्या पडल्या. आजही ही मंडळी तुरुंगातच आहेत. त्यांच्या काळ्या धंद्यांनी महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली नव्हती का? राज्यात जेव्हा सिंचन घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नव्हता का? आदर्श घोटाळ्यात एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तेव्हा राज्य बदनाम झाले नव्हते का? बॉम्बस्फोटामध्ये असंख्य मुंबईकरांनी प्राण गमावल्यानंतर ‘बड़े देशोमें ऐसी छोटी मोटी बाते होती है’, असे म्हणून जखमांवर मीठ चोळणाऱ्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नव्हती का? राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी लागेबांधे असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी तेजीत होती. तेव्हा महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली नव्हती का? असे सवाल म्हस्के यांनी उपस्थित केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.