राजकारणातील भाऊबंधकी महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मुंडे बहीण-भावांमधले राजकीय वाद हे नात्यापेक्षा मोठे झाल्याचे आजवर अनेकदा पहायला मिळाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यालाच पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिले आहे.
आता नातं उरलं नाही
आमच्यात आता बहीण-भाऊ म्हणून नातं राहिलंच नाही. आम्ही राजकारणात आता एकमेकांचे वैरी आहेत. नातेसंबंध आधी होते, त्यानंतर राजकीय वैर निर्माण झालं. त्यामुळे कुणाच्या वक्तव्याचे काय परिणाम होतात याचे ज्याने त्याने आकलन करावे, असे विधान करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले मतभेद स्पष्ट केले होते. त्याला पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिले आहे.
(हेही वाचाः ‘जो शिवतीर्थावर होतो तोच शिवसेनेचा एकमेव दसरा मेळावा’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला)
माझं कोणाशीही वैर नाही
ज्या घरात आपण जन्माला आलो ती रक्ताची नाती कधीच संपत नसतात, असे गोपीनाथ मुंडे यांनी एकदा म्हटले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मनात जरी माझ्याबद्दल वैर असलं तरी माझं कोणाशीही वैर नाही, माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. व्यक्तीच्या विचारांशी माझं वैर असतं. ज्याचे जनतेच्या हिताशी वैर असतं त्यांच्याशी माझं वैर असतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Join Our WhatsApp Community