अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल येथील दश्ती बर्ची या भागात शुक्रवारी सकाळी हा स्फोट झाला आहे. काज शैक्षणिक संस्थेत हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या आत्मघातकी हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
शैक्षणिक संस्थेत स्फोट
अफगाणिस्तानातील शिया समुदायाचे सर्वाधिक लोक राहत असलेल्या भागात हा स्फोट झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा आकडा मोठा असून स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश परीक्षा देत होते. ज्या शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्यात येत आहे त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः 67 पॉर्न वेबसाईट्स होणार ब्लॉक, केंद्र सरकारची मोठी कारवाई)
हल्ल्यांची मालिका
शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक आत्मघातकी हल्लेखोर विद्यापीठात आला. त्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश करत स्वतःला स्फोटाने उडवून दिले. अलिकडेच काबूलमधील वजीर अकबर खान परिसरात बॉम्बस्फोट झाला होता. तसेच काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाचाही तीव्र निषेध करण्यात येत होता. अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आणत अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या तालिबान राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
Join Our WhatsApp Community