पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ते अहमदाबादहून गांधीनगर येथे जात असताना पंतप्रधान मोदींनी रूग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी आपला ताफा थांबवला आणि रूग्णवाहिकेस वाट करून दिली. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
( हेही वाचा : रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग )
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रुग्णवाहिकेसाठी आपला ताफा थांबवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक रुग्णवाहिका जाताना दिसत आहे. ज्यावेळी रुग्णवाहिकाला रस्ता दिला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अहमदाबाद ते गांधीनगर या मार्गावर होता. गांधीनगर येथे शुक्रवारी मोदींनी देशातील तिसऱ्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. गांधीनगर ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ही रेल्वे धावणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी गांधीनगरपासून कालुपूर पर्यंत या नव्या रेल्वेतून प्रवासही केला. त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी, महिला उद्योजक, अनेक युवक उपस्थित होते.
रुग्णवाहिकेसाठी थांबला पंतप्रधानांचा ताफा; व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/SPxj75Ox4U
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) September 30, 2022
मोदींनी रेल्वेच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जात तेथिल तांत्रिक माहितीही जाणून घेतली. मोदी म्हणाले की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मल्टी ट्रान्सपोर्टेशनबाबत एक मोठी परिषद घेतली होती. पण तेव्हा केंद्रात दुसऱ्या पक्षाचे सरकार होते. त्यामुळे तेव्हा मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. पण तुम्ही मला दिल्लीला पाठवले आणि मी ते स्वप्न पुर्ण केले. 8 वर्षांच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक रेल्वेत केली गेली आहे. देशात दोन डझनहून अधिक शहरात मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे किंवा सुरू आहे. तत्पुर्वी मोदींनी अहमदाबादच्या फेज वन मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी अंबाजी मंदिरात दर्शन घेतले.
Join Our WhatsApp Community