ठाकरे गटाला लागली गळती आणि एकनाथ शिंदेंची चलती

139

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणीतरी ठाकरे कुटुंबाला आव्हान दिले. बाळासाहेब असताना देखील बंडखोरी झाली. काही लोक पक्ष सोडून गेले आणि आपल्यासोबत अनेक नेते व कार्यकर्त्यांनाही घेऊन गेले. तरी ती खूप सामान्य बाब होती आणि या गोष्टी सर्व पक्षात घडत असतात. परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा वेगळा होता. ती केवळ शिंदेंची भावना नव्हती तर बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार्‍या शिवसैनिकांचा उद्रेक होता.

( हेही वाचा : पुढील तीन महिन्यांत धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात करणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही)

आता हा उद्रेक वाढतच चालला आहे. गंमत म्हणजे ज्या शिवसैनिकांनी निष्ठा प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली होती, तेही आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या कन्या केमांगी महाडिक यांनी ठाकरेंना रामराम केला आहे. वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार आणि पहिले खासदार होते.

ज्यावेळी शिवसेना घडत होती, त्यावेळचे ते साक्षीदार होते. शिवसेना घडवण्यामध्ये त्यांचाही मोठा वाटा होता. त्यांची कन्या शिंदे गटात सामील झाल्यामुळे सोशल मीडियावर ठाकरे ट्रोल होत आहेत. लोक थट्टा करत ‘आता दोघं बाप-बेटेच उरणार पक्षात’ अशा प्रकारचे मीम्स बनवत आहेत. विनोदाचा भाग सोडला तर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. बाळासाहेंचे निष्ठावान एकेक करुन शिंदेंकडे जायला लागले आहेत, याचा अर्थ बाळासाहेबांचा खरा वारसा शिंदे चालवत आहेत असा होतो.

आता महानगरपालिकेची निवडणूक जवळ येईल तशी शिंदे गटातील इनकमिंग वाढणार आहे. गंमतीची बाब म्हणजे इतकं होऊन देखील ठाकरे पिता-पुत्र आपल्याच धुंदीत आहेत. गद्दार गद्दार म्हणून अजूनही ते इतरांना हिणवत आहेत. ते इतरांकडून निष्ठेचं प्रमाणपत्र घेत आहेत. खरं पाहता या ठाकरे पिता-पुत्रांनीच निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायला हवं. कारण बाळासाहेब यांची तत्वे त्यांच्या सुपुत्रांनी बाजूला ठेवून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भ्रष्ट तत्वे आत्मसात केली आहे. आणि म्हणूनच ठाकरे गटाला गळती लागली असून शिंदे गटाची चलती झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.