SBI अ‍ॅपद्वारे करा स्वस्तात रेल्वे तिकिटांची बुकिंग! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

152

SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक आहे. ही बॅंक आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देत असते. आता सणासुदीच्या काळात प्रत्येक बॅंका आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देतात. आता तुम्ही SBI योनो अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक करू शकता. SBI YONO APP वर स्वस्तात तिकीटे बुक करता येतात.

( हेही वाचा : रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग )

SBI योनो अ‍ॅपद्वारे IRCTC च्या वेबसाईटवर ट्रेन तिकीट बुक केल्यास प्रवाशांना कोणतेही पेमेंट शुल्क भरावे लागणार नाही. SBI म्हटले आहे की, YONO अ‍ॅपद्वारे तिकिटांच्या खरेदीवर पेमेंट गेटवे शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल. दरम्यान रेल्वे तिकीट बुक करताना इतर कंपन्या ३० रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. मात्र, जर तुम्ही हे तिकीट SBI योनो अ‍ॅपवर बुक केले तर तुम्हाला हे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

YONO अ‍ॅपवर तिकीट बुकिंग कसे कराल?

  • सर्वात आधी SBI YONO अ‍ॅप उघडा आणि तिकीट बुक अ‍ॅन्ड ऑर्डर या सेक्शनमध्ये जा.
  • येथे तुम्हाला IRCTC चा आयकॉन दिसेल.
  • यावर क्लिक केल्यावर IRCTC लॉगिन पेज उघडेल
  • IRCTC च्या अधिकृत पेजवर तुमच्या प्रवासाची संपूर्ण माहिती भरा.
  • तुम्ही पेमेंट पेजवर जाल तेव्हा तुमचे कार्ड किंवा बॅंक डिटेल्स भरून पेमेंट करा.
  • या अ‍ॅपवर तिकीटासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही आणि तुम्हाला प्रवासी तिकीटे स्वस्तात मिळतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.