भगवान गडाचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी महाराजांनी अतिशय आदराने उद्धव ठाकरे यांना प्रसाद दिला, तसेच तीर्थ दिले मात्र ते उद्धव ठाकरे यांनी मोठ्या शिताफीने नाकारले आणि त्यांची हीच कृती कॅमेरात कैद झाली. हाच व्हिडीओ ट्विट करत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ‘प्रसाद ग्रहण न करणारे पक्षप्रमुख, हेच आहेत जनाबसेनेचे खरे रंग…’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मंदिराच्या गाभाऱ्यात गुदमरणारे चिरंजीव आणि हातात दिलेला प्रसाद ग्रहण न करणारे पक्षप्रमुख. हेच आहेत जनाबसेनेचे खरे रंग… pic.twitter.com/BzbejQYdE0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 30, 2022
जनाबसेनेचे खरे रंग…
उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महंत सुनील महाराज आले असता, त्यांनी मोठ्या आदराने उद्धव ठाकरे यांना प्रसाद दिला त्यांनी तो हातात घेतला, परंतु ग्रहण न करता तो शेजारी उभ्या असलेल्या शिवसैनिकाच्या हातात दिला, त्यानंतर महाराजांनी तीर्थ देण्यासाठी हात पुढे करताच उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नकार दिला. प्रसाद आणि तीर्थ नाकरतानाची उद्धव ठाकरे यांची ही कृती कॅमेरात कैद झाली. हा व्हिडीओ भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ‘मंदिराच्या गाभाऱ्यात गुदमरणारे चिरंजीव आणि हातात दिलेला प्रसाद ग्रहण न करणारे पक्षप्रमुख. हेच आहेत जनाबसेनेचे खरे रंग…’, अशा शब्दांत सुनावले. अशा रीतीने अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. प्रसाद नाकारणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र केले. जनाब सेनेचे खरे रंग समोर आल्याचा दावा केला. आधीच उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडून तथाकथित हिंदुत्व स्वीकारल्याचे आरोप होत आहे, त्यानंतर आता वीर सावरकर होणाऱ्या टीकेवर मौन बाळगत असल्याने त्यांच्यावर हिंदुत्व विरोधी झाल्याचेही टीका होऊ लागली असताना आता प्रसाद नाकारल्याबद्दल त्यांच्यावर धर्मविरोधी झालेत का,अशीही टीका होईल का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा पीएफआयवरील बंदीनंतर हिंदुत्ववादी नेत्यांना धमकीचे फोन)
Join Our WhatsApp Community