मागच्या सहा महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धामुळे अमेरिका सातत्याने रशियावर निर्बंध जाहीर करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशांसाठी करार केला आहे. रशियाच्या या कारवाईविरोधत अमेरिकेने लगेच रशियावर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने रशियाच्या 1 हजार लोकांवर बंदी घातली आहे. यामध्ये रशियन लष्कराचे सदस्य, बेलारुसी लष्करी अधिकारी आणि अनेक रशियन नागरिकांनी समावेश आहे.
अमेरिका सातत्याने रशियावर निर्बंध घालत आहे. आता पु्न्हा नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेच्या 1 हजार नागरिकांवर रशिया प्रशासनाने बंदी घातली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशांसाठी करार केला आहे. याविरोधात अमेरिका आक्रमक झाली आहे. रशियाने केलेल्या या कराराला युक्रेनच्या जनतेसह पाश्चात्य अधिका-यांनी रशियाचा ताबा बेकायदेशीर दावा असल्याचे म्हटले आहे.
( हेही वाचा: पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, एकूण फेऱ्यांची संख्या १३८३ )
लष्करी अधिका-यांसह नागरिकांवर बंदी
अमेरिकेने रशियाच्या हजार व्यक्तींवर व्हिसा निर्बंध लादण्याचा निर्यण घेतला आहे. व्हिसावर बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये रशियन फेडरेशनचे लष्करी सदस्य, बेलारशियन लष्करी अधिकारी आणि रशियासाठी पडद्यामागून काम करणारे काही रशियन गुप्त अधिकारी, तसेच अनेक रशियन नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने युक्रेनच्या युद्धकैद्याविरुद्ध मानवी हक्कांचे घोर उल्लंघन केल्याच्या निषेधार्थ हे निर्बंध लादल्याची माहिती यूएस स्टेट डिपार्टमेंटने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. यामध्ये त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community