माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार! रेल्वेकडून दुरूस्तीची कामे पूर्ण, चाचणी सुरू

195

मुंबईपासून जवळ असल्यामुळे माथेरानला अनेक पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच पुन्हा एकदा सुरू होणार आहे. गुरूवारपासून या ट्रेनची चाचणी सुरू आहे. तब्बल ३ वर्षांनंतर ही ट्रेन पुन्हा एकदा प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे नेरळ आणि माथेरान डोंगराळ भागातून जाणाऱ्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते. रुळांखालील खडीही वाहून गेल्या होत्या. त्यामुळे नेरळ माथेरान या मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

( हेही वाचा : डिजिटल इंडियाच्या संकल्पनेसाठी 5G तंत्रज्ञान फायदेशीर – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

लवकरच ही मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत

सध्या अमन लॉज ते माथेरान ही सेवा सुरू असून अमन लॉजपर्यंत पर्यटकांना टॅक्सीने जावे लागत आहे. आता नेरळ ते माथेरान या मार्गावर नवीन रूळ, खडी तसेच अन्य कामे करण्यात आली आहेत. नेरळ ते अमन लॉज मार्गावर २० किलोमीटरच्या नव्या रूळांचे काम हाती घेण्यात आले आहे. अपघात होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या आहेत. लवकरच ही मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत येईल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवेला सध्या प्रवाशांची पसंती मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेला एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांमध्ये १ कोटी रुपयांहून अधिक फायदा झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.