मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नाट्य देशभरात पाहायला मिळाले, अध्यक्षपदासाठी आधी अशोक गेहलोत यांना हायकमांडने उभे रहाण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नकार दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून चर्चेला उधाण आले होते. अखेर अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरले, त्यात मल्लिकार्जुन खर्गे यांना हायकमांडने उमेदवारी दिली आहे, तर शशी थरूर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के एन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे.
१७ ऑक्टोबरला होणार निवडणूक
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, तुर्तास तरी दोन्ही गट पाहता ही निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये २० पैकी ४ फॉर्ममधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ते नाकारण्यात आले आहेत. आता या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने असतील, असे ते म्हणाले. या दोन्हीपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु होईल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
Join Our WhatsApp Community