मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली; ३८० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

164

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १ कोटी ४२ हजार ६६६ कोटी लिटर अर्थात १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सर्व तलावांमधील एकूण पाणी साठ्याच्या ९८.५७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. १ ऑक्टोबर २०२२ यासर्व तलावांमध्ये एवढा पाणी साठा जमा झाला असून पुढील ३८० दिवस पुरेल इतका पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची मुंबईकरांची चिंता दूर झाली आहे.

( हेही वाचा : 5G तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने मोडकसागर, तानसा, तुळशी, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये यंदा ऑगस्ट महिन्यातच पुरेसा पाऊस पडून तलावांच्या पाण्याची पातळीत वाढ झाली होती. मात्र, ३० सप्टेंबर पर्यंत ही पाण्याची पातळी ९७ ते ९८ टक्के एवढेच राहिले. त्यामुळे १ ऑक्टोबरला यासर्व तलावांमध्ये एकूण पाण्याची पातळी ही ९८.५७ टक्के एवढी झाली.

मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आवश्यक असतो. त्यातुलनेत यासर्व तलावांमध्ये १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. हा साठा पुढील ३८० दिवस पुरेल इतका असला तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा एकूण साठा कमी असल्याचेही दिसून येत आहे.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणी साठा तलाव क्षेत्रात जमा झाल्याने महापालिकेच्या जलअभियंता विभागाने समाधान व्यक्त केले असून तांत्रिक कपात वगळता पाण्यामुळे कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१ ऑक्टोबरपर्यंतचा मागील तीन वर्षांमधील पाणी साठा

  • सन २०२२ : १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर(९८.५७)
  • सन २०२१ : १४ लाख ३६ हजार १८३ दशलक्ष लिटर(९९.२३)
  • सन २०२२ : १४ लाख ३० हजार ६०९ दशलक्ष लिटर(९८.८४)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.