पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मारगल्ला पोलीस ठाण्याच्या एरिया मॅजिस्ट्रेटने माजी पंतप्रधानांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. शुक्रवारी, 30 सप्टेंबर रोजी इम्रान खान इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांची माफी मागितली.
पाकिस्तानची शांतता व्यवस्थेला बाधा आणण्याचा कट
इम्रान खान यांनी एका प्रचारसभेत महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकी दिली होती. 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांनी त्यांचे सहकारी शाहबाज गिल यांच्याशी झालेल्या वागणुकीबद्दल उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली. शाहबाज गिलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 20 ऑगस्ट रोजी शाहबाज गिल यांच्या pakistanअटकेविरोधात इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. या रॅलीचे सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण केले. या रॅलीत इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅलीत देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानची शांतता व्यवस्थेला बाधा आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा भुजबळांना उपरती, आले थेट सरस्वती देवीच्या चरणी)
Join Our WhatsApp Community