युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे रविवारी पाहायला मिळाले.
(हेही वाचा – “… सगळं कसं ok मध्ये आहे”, म्हणत शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा)
ऐन दसरा मेळाव्याच्या ठाकरेंच्या मतदारसंघातील तोंडावर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहे. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी गळती सुरू झाली आहे. ही गळती थांबवण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. तर वर्षा बंगल्याबाहेर रविवारी सकाळीच मोठ्या संख्येने कोळी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तब्बल ५०० कोळी बांधवांनी शिंदे गटात प्रवेश केला. कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांनी आदित्य ठाकरेंकडे सातत्याने विविध मागण्या केल्या होत्या. मात्र त्या पूर्ण न झाल्याने कोळी बांधवांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंना किंवा शिवसेनेला हा धक्का नाही तर आणखी धक्का बाकी आहे. अजून अनेकांचा लवकरच शिंदे गटात प्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे हेच खरे जनतेचे मुख्यमंत्री आहे, अशीच भावना नागरिकांची आहे. आज पहिल्यांदाच महापालिका कर्मचाऱ्यांना कोणत्याही आंदोलनाशिवाय त्यांना त्यांचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे हा मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना आपल्यातीलच एक वाटतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community