आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनेकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. कधी रोड शो मध्ये तर कधी जाहीर कार्यक्रमांत त्यांना उपस्थितांनी लक्ष्य केले आहे. त्यांच्यासोबत अशीच एक घटना आता गुजरात येथे घडली आहे. शनिवारी रात्री राजकोट येथील एका गरबा कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला आहे.
गरबा कार्यक्रमावेळी घडला प्रकार
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी शनिवारी गांधीधाम आणि जुनागढ येथे सभा घेतल्या. त्यानंतर त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह गरबा कार्यक्रमासही हजेरी लावली. त्याचवेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समुदायातून कोणीतरी केजरीवाल यांना प्लॅस्टिकची पाण्याची बाटली फेकून मारल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बॉटल अटॅक, राजकोट येथील गरबा कार्यक्रमावेळी घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल#arvindkejriwal #cmodilhi #bottleattack #garba #delhi #hindusthanpost pic.twitter.com/FUWcS4PUQh
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 2, 2022
(हेही वाचाः राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल खरे ‘माफीवीर’! कारवाईला घाबरुन अनेकदा टेकले गुडघे)
काय झाले नेमके?
राजकोटच्या खोडलधाम गरबा कार्यक्रमाला केजरीवाल आणि मान उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत असताना केजरीवाल यांच्या दिशेने कोणीतरी बाटली भिरकावली. त्यावेळी ही बाटली त्यांच्या डोक्यावरुन गेली असून यामुळे केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही बाटली नेमकी कोणी फेकली याची माहिती मिळाली नसून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community