पीएफआयच्या माध्यमातून समाजकंटकांची फौज उभी करण्याचा डाव

143

पीएफआय या संघटनेचा एकाच वेळी देशातील सर्व बाजूने अशांतता निर्माण करण्याचा डाव होता. त्यासाठी देशभरातील कानाकोपऱ्यातील मुसलमान तरुणांमध्ये अशांतता निर्माण करून त्यांच्याकडून दंगली घडवून आणण्याचे कारस्थान रचले होते.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. असेच केरळमधून काही धर्मांध मुसलमानांना अटक केली, जे पीएफआयसाठी जबाबदारीची कामे करत होते. त्यांची न्यायालयाच्या परवानगीने घेतलेल्या जबाबात, पीएफआयचा समाजकंटकांची फौज उभी करण्याचा डाव होता, हे स्पष्ट होते. लखनऊ येथील कारागृहात बंदिस्त पीएफआयचे कार्यकर्ते अनसद बदारुद्दीन आणि मोहम्मद फिरोज खान या दोघांच्या जबानीतून यासंबंधी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

(हेही वाचाः ‘सिमी’चेच दुसरे रूप पीएफआय)

बॉम्ब बनवण्याचे दिले जाते प्रशिक्षण

पीएफआयचा केरळ येथील दुसरा दहशतवादी मोहम्मद फिरोज खान याने जबाबात सांगितले की, मी २००५ मध्ये पीएफआयमध्ये सहभागी झालो. संघटनेच्या कामानिमित्त मी कतार आणि सौदीला अनेकदा भेट दिली आहे. मी जुन्या चारचाकींच्या खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करतो. मी पीएफआयच्या हिट स्क्वॉडचा सदस्य आहे. मी अनसदसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि पीएफआयच्या वतीने मुस्लिम तरुणांना प्रशिक्षण देतो.

असे होते प्रशिक्षण

प्रशिक्षण सत्रात आम्ही चाकू, तलवारी, पिस्तूल आणि लोखंडी रॉड कसे चालवायचे ते शिकवतो. तसेच पेट्रोल बॉम्ब बनवण्याचे आणि वाहनांना आग लावण्याचे प्रशिक्षण देखील देतो. आम्ही दंगली दरम्यान शक्य तितक्या लोकांना मारण्याचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी गन पावडर आणि जाळपोळ करण्याचे प्रशिक्षण देखील देतो. आमच्याकडे हिट स्क्वॉड नावाची एक संस्था आहे ज्याचे सदस्य पीएफआयच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला मारू शकतात. मी आणि अनसदने उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये प्रशिक्षण दिले आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच मी तुम्हाला या ठिकाणांबद्दल सांगू शकेन. आमचा सर्व खर्च कमल केपी करतात.

 

(हेही वाचाः मुस्लिमांना दहशतवादी बनवणारी पीएफआय)

पीएफआयमध्ये सामील झाल्यानंतर मी पीएफआयसाठी खूप काम केले आहे. पीएफआयच्या अनेक गुप्त संघटना आहेत. मला हिंदी येत असल्यामुळे मला उत्तर भारताची जबाबदारी दिली आहे. मी पीएफआयसाठी फिरतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग देतो. हे प्रशिक्षण अतिशय समर्पित मुलांना दिले जाते. हे प्रशिक्षण घेणारी मुले पीएफआयच्या हिट स्क्वॉडचे सदस्य बनतात. ही मुले पीएफआयसाठी काहीही करायला तयार असतात. मी आणि माझा जोडीदार फिरोज शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणात आपण चाकू, तलवारी वापरण्याचे तसेच पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देतो. अशा प्रशिक्षणात एखाद्या व्यक्तीला लोखंडी रॉडने कुठे मारायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय मी आणि फिरोज पेट्रोल बॉम्ब बनवण्याचे आणि चालवण्याचे प्रशिक्षणही देतो. शिवाय, मला आणि फिरोजला आयईडी आणि स्फोटकांनी बॉम्ब बनवण्याचे काम माहीत आहे.

हिंद संघटनांच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे निर्देश

सीएए, एनआरसीला विरोध आणि बाबरी मशिदीवरील निर्णयामुळे पीएफआय सध्या मुस्लिमांमध्ये खूप लोकप्रिय आहे, ज्यामुळे मुस्लिम तरुण सहजपणे पीएफआयचे सदस्य बनतात. या परिस्थितीचा फायदा घेत पीएफआयने उत्तर भारतात आपल्या सदस्यांना सक्रीय केले आहे. कमल साहिब हे दिल्ली पीएफआय कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात, रौफ शरीफ सिद्दीक कप्पन थिंक टँक म्हणून काम करतात. दिल्लीत राहून पीएफआयसाठी बाबरी मशिदीवरील निर्णयानंतर त्यांनी हिंद संघटनांच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे निर्देश दिले होते.

(हेही वाचाः काय आहे हलाल जिहाद? जाणून घ्या…)

पीएफआयचा हिट स्क्वॉड तयार

केरळ येथील आरोपी अनसद बदारुद्दीन याची कारागृहात चौकशी करून जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी आरोपी अनसद याने सांगितले की, तो २०१० पासून पीएफआयशी जोडलेला आहे. तो म्हणाला की, मी आखाती देशात सुतार म्हणून काम केले होते, जिथे मला हाताला दुखापत झाली होती आणि नंतर मी भारतात परतलो. मला अनेक सुविधा मिळाल्या, पीएफआयच्या इतर सदस्यांशी समन्वय साधण्यास मला मदत मिळायची. फिरोज आणि मी लखनऊ आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आणि राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर शस्त्रांचा साठा ठेवण्यात आला. पीएफआयने हिट स्क्वॉड तयार केले. या विशेष पथकाला शस्त्रे चालवणे आणि स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच दंगली घडवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते, अशाप्रकारे अनसद या आरोपीने पीएफआयच्या सदस्यांना शारीरिक आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे कबूल केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.