दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या विजयसोबतच टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला मायदेशात टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. तसेच, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 237 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिले षटक मेडन टाकल्यानंतर दुस-या षटकात अर्षदिपने दोन विकेट्स घेतले. मात्र, त्यानंतर अॅडम माक्रमरम, क्विंटन डी काॅक आणि डेव्हिड मिलर यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 221 मजल मारली. मिलरने आपले वेगवान शतक पूर्ण केले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
( हेही वाचा: खडसे फडणवीसांना म्हणाले, ‘बसू आणि मिटवून टाकू’! महाजनांचा गौप्यस्फोट )
रोहितने रचना इतिहास
या मालिकेत विजयासोबतच कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत भारतात एकही टी-20 मालिका हरला नव्हता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. यासोबतच ही तीन सामन्यांची मालिकादेखील भारतीय संघाने आपल्या नावे केली आहे. भारतीय भूमीवर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
Join Our WhatsApp Community