गोव्यातून दारु आणाल तर होणार जेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा

132

गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. गोव्यातील अवैधरित्या आणल्या जाणा-या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिका-यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असे देसाई म्हणाले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असेही देसाई यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री )

तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपाईंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना

शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला गोवा आणि सिंधुदुर्गला जोडणा-या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपाॅइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये खूप स्वस्तात दारु मिळते. दरामध्ये असलेल्या फरकामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होत असते. महाराष्ट्रातदेखील मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारु येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.