बनावट औषधांचे सेवन केल्यामुळे रुग्णांना अनेकवेळा इतर शारीरिक समस्या जाणवतात. गेल्या काही दिवसात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठीच आता केंद्र सरकार लवकरच औषधांबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. बनावट औषधे ओळखण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा किंवा ग्राहकांकडे तशी सुविधाही नाही. आता मात्र लवकरच औषधांची सत्यता तपासण्यासाठी क्यूआर कोड ही सुविधा येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला औषधांची सविस्तर माहिती मिळणार आहे. यात सर्व १०० रुपयांहून अधिक किंमतीच्या औषधांचा समावेश असेल.
( हेही वाचा : महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणूक )
ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा आणणार
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वापर रोखण्यासाठी आणि औषधांची सत्यता पडताळण्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस ही यंत्रणा सुरू करण्याची सरकारची योजना आहे. औषधांच्या प्राथमिक उत्पादन पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा QR कोड लावण्यात येतील. प्राथमिक उत्पादनांमध्ये बाटल्या, कॅन, जार यांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होणार आहे.
गेल्या काही वर्षांत बाजारात बनावट आणि निकृष्ट औषधांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने या महत्त्वाच्या योजनेच्या दिशेने पावले उचलली आहेत. ट्रॅक अँड ट्रेस या योजनेमुळे आता अनेक रुग्णांना तसेच वृद्धांना त्यांच्या औषधांची सविस्तर माहिती घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मिळवता येणार आहे.
Join Our WhatsApp Community