राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी पावसात भिजत सभा घेतल्यामुळे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. तेव्हापासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात वाद अधूनमधून उफाळून येत असतो. हे दोघे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. असाच एक टोला उदयनराजे भोसले यांनी पवारांवर केली आहे.
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
राजघराण्याने रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. पण ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतले जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, असा टोला उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा आणि आज्जी छत्रपती सुमित्राराजे हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतू राहिला नाही. रयतमध्ये राजकारण येऊ नये, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असे ठरले होते. अचानक बदल झाला आणि ‘हे’ त्यात आले. ज्यांचे योगदान नाही त्यांना तुम्ही घेत आहेत. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे की बारामतीकरांची हे समजत नाही, अशी टीका उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.
Join Our WhatsApp Community