अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सातवी फेरी अर्थात दैनंदिन गुणवत्ता फेरीला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दैनंदिन गुणवत्ता फेरीअंतर्गत प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार)
अकरावी प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित, तीन विशेष प्रवेश फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश फेरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community