धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरच आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकही जाहीर झाल्याने या दरम्यान धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला होऊ शकणार का याची उत्सुकता लागली आहे.
शिंदे गटाची कागदपत्रे मिळावीत, या ठाकरे गटाच्या मागणीवर शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. तर ठाकरे गटही प्राथमिक कागदपत्रे 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: Patra Chawl Case: राऊतांचा दसरा मेळावा कोठडीतच; 10 ऑक्टोबरपर्यंत ED कोठडीत वाढ )
निवडणूक आयोग निर्णय देणार?
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. आता या कागदपत्रांवर निवडणूक आयोग निर्णय देणार की त्या क्षणाची स्थिती लक्षात घेऊन शिवसेनेला ते चिन्ह कायम ठेवणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महत्त्वाचे असतील.
Join Our WhatsApp Community