शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दोन गटात विभागला गेला आहे. शिंदे गटात आणि ठाकरे गटात दसरा मेळाव्यासाठी सर्वाधिक गर्दी खेचण्यासाठी दोन्ही गटामध्ये चुरस सुरू आहे. या दोन्ही गटांपैकी सर्वाधिक गर्दी कुणाच्या मेळाव्यात होणार, असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. परंतु शिंदे गटाच्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मुंबई पोलिसांचा सर्वे समोर
शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत खाजगी वाहने, बसेस आणि ट्रेनने दाखल होणार आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी होणार आहे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही गटापैकी सर्वाधिक गर्दी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी उसळणार असल्याचे मुंबई पोलिसाच्या सर्व्हेतून समोर आले आहे.
(हेही वाचा ११ महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तुरूंगाबाहेर कधी येणार?)
वाहनांसाठी पार्किंग
मुंबई पोलिसांचा सर्व्हे आणि शिंदे गटाची एकंदर तयारी बघून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून शिंदे गटाची वाहने पार्क करण्यासाठी २३ ठिकाणे, तर ठाकरे गटाची वाहने पार्क करण्यासाठी केवळ १२ ठिकाणांची व्यवस्था करण्यात आलेली आहेत. या पार्किंगच्या ठिकाणावरून दसरा मेळाव्यात शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांच्या सर्व्हेनुसार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सर्वाधिक संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार आहे, ज्या वाहनातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पुढारी मुंबईत दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत, त्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी पार्किंग व्यवस्था केली आहे.
Join Our WhatsApp Community