विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केली. त्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना टोला हाणला. दर महिन्याला १०० कोटींची खंडणी घेणारे, उद्योगपतींच्या घरासमोर जिलेटिन ठेवणारे, प्रत्येक प्रकल्पात १० टक्के कमिशन घेणारे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडवणीसांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आले आहे, असे म्हटले.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत त्यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, दर महिना १०० कोटींची खंडणी वसूल करणारे, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवणारे, प्रत्येक प्रकल्पामागे १० टक्के कमिशन घेणारे अशा अडीच वर्षांचा हा काळाकुट्ट कालखंड संपून राज्यात शिवसेना-भाजपचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आल्याने आता उद्योजक भयमुक्त महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. नीलम ताई, चिंता तुमच्या पक्षाची करा ताई… महाराष्ट्रातील व्यापार उदीम सुरक्षित आहे, असे म्हणाल्या.
महिना १०० cr.खंडणी वसूली
उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी
प्रत्येक प्रकल्पामागे १०% कमिशन;अडीच वर्षांचा हा काळाकुट्ट कालखंड संपून राज्यात शिवसेना भाजपचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आल्याने आता उद्योजक भयमुक्त महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत..(१/२) @neelamgorhe pic.twitter.com/aP1bdDh0Cj— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 3, 2022
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उट-सूठ शिवसेनेवर टीका करणे हे त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन बनले आहे. विकासकामात राजकारण न करता ते काम अविरतपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र असे न करता या सरकारकडून प्रत्येक कामाला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केला. दिल्लीतील केंद्रातील भाजप सरकारचा प्रादेशिक पक्ष संपविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. जो त्यांच्या सोबत जातो त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्या माणसाचा रस्ता बंद करायचा ही कुठली राजकीय कपटनीती आहे?, हा संशोधनाचा विषय आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
(हेही वाचा ११ महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तुरूंगाबाहेर कधी येणार?)
Join Our WhatsApp Community