उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील पर्वताच्या शिखरावर हिमस्खलन झाले असून यात २८ जण अडकले आहेत. यापैकी अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाची घटना घडली तेव्हा जवळपास १७० गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील SDRF ची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! ५ ऑक्टोबरला वाहतुकीत होणार ‘हे’ बदल; अनेक मार्गावर ‘प्रवेशबंदी’, तर काही भागात ‘नो पार्किंग झोन’ )
UPDATE | Eight mountaineering trainees rescued, efforts underway to rescue the remaining (estimated) 21 more people stuck in the Uttarkashi avalanche: District Disaster Management Centre of Uttarkashi https://t.co/IctiB5aPrc pic.twitter.com/rjlKlFnoDT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2022
२१ जणांचा शोध सुरू
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील पर्वताच्या शिखरावर अडकलेल्या २८ जणांपैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर २१ जणांचा शोध सुरू आहे. भारतीय हवाई दलाचे चित्ता हे हेलिकॉप्टर बचाव कार्यात तैनात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात लष्कराची मदत मागितली आहे.
Join Our WhatsApp Community