सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस गॅस्ट्रो आणि हेपेटायटीसचे रुग्ण वाढल्याचे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र इतर पावसाळी आजारांच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्ण जास्त आढळले आहे. मलेरियाचे ६५९ रुग्ण ३० सप्टेंबरपर्यंत सापडले. गॅस्टो आणि हेपेटायटीसची बाधा दूषित पाण्याच्या सेवनाने होत असल्याने पालिका आरोग्य विभागाने रस्त्यावरचे अन्नपदार्थ न खाण्याचे आवाहन केले आहे.
( हेही वाचा : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटासोबत कसे?)
मलेरिया खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीत आढळले. गॅस्ट्रोची ३७१ रुग्णांना बाधा झाली. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिस-या स्थानावर नोंदवली गेली, तर डेंग्यूचे २१५ रुग्ण दिसून आढळले आहेत. हेपेटायटीसचे ६९, लॅप्टोचे ४७ तर स्वाईन फ्लूचे १४ रुग्ण सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदवले गेल्याचे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत पावसाळी आजारांचे प्रमाण मुंबईत आता कमी झाले असल्याचेही पालिका आरोग्य विभागाने सांगितले.
काय काळजी घ्याल –
- रस्त्यावरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका
- अन्नाचे सेवन करण्याअगोदर हात धुवा
- ताप, डोकेदुखी किंवा उलट्या वारंवार होत असल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका. तातडीने पालिका दवाखाने किंवा रुग्णालयाला भेट देत उपचाराला सुरुवात करा.