स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमामधील प्रशिक्षक व विद्यार्थ्यांच्यावतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सायंकाळी दसऱ्याच्या पूर्व संध्येला खंडे नवमीनिमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
( हेही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तापासून 5G, रिलायन्स जिओची बाजी!)
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील विविध क्रीडा उपक्रमातील प्रशिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रंथालय, दवाखाना, नृत्य, गायन, स्मारकाचे न्यूज पोर्टल हिंदुस्थान पोस्ट आदी उपक्रमातील संलग्न व्यक्तींनीही शस्त्रपूजन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्ताने वीर सावरकर स्मारकातील तायक्वांदोचे राजेश खिलारी, रायफल शूटिंगचे विश्वजित शिंदे, मुष्टीयुद्ध प्रशिक्षणाचे राजन जोथाडी, तिरंदाजीचे स्वप्निल परब यांनी उपक्रमांविषयी सांगताना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीबद्दल माहिती दिली. तायक्वांदोमधील यशस्वी खेळाडू, तिरंदाजीतील यशस्वी खेळाडू, रायफल शूटिंगमधील यशस्वी खेळाडूंची माहिती देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
Join Our WhatsApp Community