शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा दोन दसरा मेळावे होणार असले, तरी या दोन्ही मेळाव्यांत ‘शिंदें’चेच गाणे वाजणार आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दोन्ही गटांनी नवी गाणी तयार केली असून, दसरा मेळाव्याच्या मंचावर त्याचे लॉंचिंग केले जाणार आहे.
(हेही वाचा – रावसाहेब दानवेंनी घेतली राजेश टोपे यांची गुप्त भेट; तर्कवितर्कांना उधाण)
#Shivsena #दसरा_मेळावा #दसरा_मेळावा_२०२२ #EkSenaEksathEknath pic.twitter.com/EUeqH492Ln
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 4, 2022
या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच परिवारातील दोन सदस्यांनी गायली आहेत. योगायोगाने त्यांचे आडनावही ‘शिंदे’ आहे. उद्धव ठाकरे गटाचे गाणे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी, तर एकनाथ शिंदे गटाचे गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. दोघांत वडील मुलाचे नाते आहे. विशेष म्हणजे आनंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत सदस्य असून, महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेल्या १२ नावांच्या यादीत त्यांचे नाव होते.
गीतांच्या ओळीही सूचक
शिवसेनेतील बंडखोरी गीतामधून मांडण्याची जबाबदारी आनंद शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वगळून तुम्ही शिवसैनिक होऊन दावा रं…’, असे गीताचे बोल आहेत. तर आदर्श शिंदे यांनी शिंदे गटासाठी गायलेल्या गीताचे बोल आहेत, ‘आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे वारकरी’. ही दोन्ही गाणी दसरा मेळाव्याला त्या-त्या गटाच्या मंचावर सादर केली जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community