राज ठाकरे यांचे दोन्ही शिवसेना दसरा मेळाव्याकडे लक्ष : एकाची सभा पाहणार तर दुसऱ्याची ऐकणार

113

शिवसेना दसरा मेळावा यंदा दोन मैदानांवर होत असून परंपरागत दसरा मेळावा आपला म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. एरव्ही विचारांचे सोने लुटण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या अशाप्रकारे आवाहन करणाऱ्या या शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांमध्ये सहभागी होणारे शिवसैनिक द्विधा मनस्थित आहे. एकाच वेळी दोन्ही मेळावे होणार असल्याने कुणाचे विचार ऐकायचा याचा विचार शिवसैनिक करत असले तरी कधी एकेकाळी शिवसेनेपासून फारकत घेत मनसेची स्थापना करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र उध्दव ठाकरे यांची सभा प्रत्यक्ष पाहणार आहे. उध्दव ठाकरे यांची सभा ते पाहणार असले तरी शिंदे गटाचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरेंचा आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेलेल्या ठाकरे यांच्या पक्षाचा कसा समाचार घेतात हे मात्र जरुर ऐकणार आहेत, असे समजते.

( हेही वाचा : शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यातील व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची!)

एरव्ही मुंबईत दसऱ्याला विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजीपार्कवर मोठ्याप्रमाणात गर्दी करत असले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रत्यक्ष हजेरी लावणाऱ्या शिवसैनिकांमध्येच घट झाली आहे. बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील सभेत आजवर मला जसे सांभाळून घेतलेत तसेच माझ्या उध्दवला आणि आदित्यला सांभाळून घ्या असे आवाहन केले होते.त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या मेळाव्याकरता हजेरी लावत आले आहे. परंतु यंदा शिवसेनेचे दोन गट झाले असून या शिवसेनेतील शिवसैनिकांचेच विभाजन झाले आहे. तरीही शिवाजीपार्कमध्ये विक्रमी गर्दी करून शिवसैनिकांमध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास रोवण्यासाठी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबईतील प्रत्येक शाखाशाखांना गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले असून शिंदे यांच्यासह भाजप हे उध्दव ठाकरे यांच्या निशाण्यावर असणार आहे.

दुसरीकडे मूळ शिवसेना आपलीच आहे असा दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेला शिवाजीपार्कपेक्षा अधिक गर्दी जमवताना शिवसैनिकांशी असलेले भावनिक नाते जपण्यासह बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे अभिप्रेत शिवसेना पुढे नेण्याचेही आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही सभा या गर्दीचा उच्चांक मोडण्याचा प्रयत्न करणार असून दोन्ही पैंकी शिवसेना चालवण्यास लायक कोण आणि विचार कुणाकडे आहेत हेही स्पष्ट होणार आहेत. विशेष म्हणजे एरव्ही इमारतीच्या टेरेसवर उभे राहून शिवसेनेसह इतर पक्षांच्या सभा न्याहाळणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानाची नवीन इमारत उभारली आहे. या शिवतिर्थ इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन शिवाजीपार्कवरील प्रत्येक कोपऱ्यावरील भागाचे दर्शन घडते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या सभेतील गर्दी राज ठाकरे हे प्रत्यक्ष न्याहाळणार आहेत. यंदा प्रथमच ते घरी बसून जमलेल्या जनसमुदायाला पाहताना घरी बसूनच भाषणाचा आनंद घेणार असल्याचे दिसून येते.

परंतु या सभेच्यावेळीच वांद्रे कुर्ला संकुलात शिंदे गटाचाही शिवसेना दसरा मेळावा होत असल्याने राज ठाकरे यांचे शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे जर दोन्ही भाषणे एकाच वेळी झाल्यास राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांची सभा पाहतील, परंतु एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण पाहतील असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.