मागील सहा वर्षांपासून पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या किल्ला बागेची देखभाल- दुरुस्ती आपल्या विभागाकडून होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाने किल्ला बाग महापालिकेच्या ताब्यात दिली. यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एक कोटी ८० लाख रुपये खर्च करुन किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
भुईकोट किल्ल्याचे संवर्धन आणि परिसरातील अतिक्रमण या विषयांवर दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने केलेल्या चर्चेमध्ये किल्ला परिसरातील अतिक्रमण हटवून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून अंतर्गत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने २०१६ मध्ये किल्ला बाग ताब्यात घेतली होती. आता या बागेची देखभाल- दुरुस्ती होत नसल्याने पुन्हा महापालिकेने बाग ताब्यात घ्यावी, अशी विनंती पुरातत्त्व विभागाने केली आहे. त्यामुळे ही बाग महापालिकेने ताब्यात घेतली आहे.
( हेही वाचा: ‘असा’ करा तुमच्या SIM Cardमध्ये 5G इंटरनेट Activate )
Join Our WhatsApp Community