रेल्वेमधील पंखे चोरीला जाऊ नयेत, म्हणून रेल्वेने वापरलीय ‘ही’ भन्नाट युक्ती

125

जगात भारतात रेल्वेचे जाळे मोठे आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत चोरांपासून रेल्वेची संपत्ती वाचवणे हे रेल्वेव्यवस्थापनासमोर एक मोठे आव्हान असते. ट्रेनमधील पंखे आणि बल्ब चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वेने या चोरीला आळा घातला.

रेल्वेने या तंत्रज्ञानाचा केला वापर

स्विच, बल्बबरोबरच रेल्वेतील पंख्यांची चोरी झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे इंजिनिअर्स पंख्यांचे अशा प्रकारे डिझाईन केले आहे की ते घरात किंवा दुकानात वापरता येणार नाहीत. केवळ ट्रेनमध्येच हे पंखे वापरता येऊ शकतात. आता घरात हे पंखे का लागू शकत नाहीत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर जाणून घेऊया.

( हेही वाचा: भारताच्या शेजारील ‘या’ देशात आहे झिरो कार्बन )

केवळ ट्रेनमध्येच लागू शकतात हे पंखे

आपल्या घरात दोन प्रकारची वीज वापरली जाते. पहिला AC म्हणजे Alternate Current आणि दुसरा DC म्हणजे Direct Current. आपल्या घरांमध्ये वापरल्या जाणा-या अल्टरनेट करंटची कमाल शक्ती 220 व्होल्ट आहे आणि डायरेक्ट करंटचा घरात वापर केला जातो तेव्हा तो फक्त 5, 12 किंवा जास्तीत जास्त 24 व्होल्ट इतका असतो. याच गोष्टींचा विचार करुन इंजिनिअर्सने ट्रेनमध्ये लागणारे पंखे 110 व्होल्टचे बनवले आहेत आणि जे फक्त DC वर चालू शकतात. त्यामुळे विचार केला तरी हे पंखे घरात वापरता येऊ शकत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे ट्रेनमधून पंखा चोरलाच तर त्या व्यक्तीला 7 वर्षांची जेल आणि आर्थिक दंड लागू शकतो.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.