राज्यात प्रचंड वेगाने कोरोना रुग्णसंख्येत घट सुरु असताना बुधवारी राज्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची खुशखबर आरोग्य विभागाने दिली. दर दिवसाला एकही कोरोना मृत्यू न होण्याचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत दुस-यांदा आढळून आले. या आठवड्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दोन हजारांवर खाली येईल, अशी शक्यता आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी वर्तवली.
(हेही वाचा – आमचा दसरा मेळावा, त्यांचा कचरा मेळावा, भास्कर जाधवांचा हल्लाबोल)
बुधवारी राज्यात केवळ ४१६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर गेल्या २४ तासांत ४७७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.१४ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. राज्यात आता २ हजार ६५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मृत्यूदर आता १.८२ टक्क्यांवर नोंदवला जात आहे.
राज्यात पुण्यात सर्वात जास्त रुग्णंख्या दिसून येत आहेत. पुण्यात ७३३ कोरोना रुग्णांना उपचार सुरु आहेत. त्याखालोखाल मुंबईत ७१५, ठाण्यात ३०७, नागपूरात ११६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community