सगळं बरखास्त करा, शिंदे राज्य येऊ द्या – जयदेव बाळासाहेब ठाकरे

179

बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मेळाव्याला लावलेली उपस्थिती सर्वात लक्षवेधी ठरली. ‘हा एकनाथ कष्टकरी, मेहनत करणारा आहे. त्याला दुरावा देऊ नका. आता हे सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका घ्या. शिंदे राज्य येऊ द्या’, अशी थेट मागणी त्यांनी केली.

एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना जयदेव बाळासाहेब ठाकरे म्हणाले, सर्वप्रथम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र. एकनाथ हा माझा खूप आवडीचा आहे. आता मुख्यमंत्री झाल्यामुळे एकनाथराव म्हणावे लागेल. गेल्या पाच सहा दिवसांपासून मला सातत्याने फोन येत आहेत, तुम्ही शिंदे गटात गेलात का? त्यांना एकच सांगू इच्छितो, हा ठाकरे कोणाच्या गोटात बांधला जात नाही. शिंदेंनी चार-पाच भूमिका घेतल्या त्या मला आवडल्या. त्यामुळे मी इथे आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा: उध्दव ठाकरेंना मोठा झटका: बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदेसोबत )

शिंदेंना एकटे पाडू नका

असला धडपडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे. कारण तो कष्टकरी, मेहनत करणारा आहे. आपला एक इतिहास आहे, चिपळ्या वाजवणाऱ्या नाथाला जवळच्यांनीच संपवले. त्यामुळे या एकनाथाला एकटे राहू देऊ नका. त्याला दुरावा देऊ नका. आता हे सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका घ्या. शिंदे राज्य येऊ द्या, अशी मागणीही जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.