गेल्या ५२ वर्षांच्या शिवसेनाच्या दस-या मेळाव्याच्या शिवाजी पार्क येथील सभा मी पाहिल्या. मात्र आजच्या सभेत मोठ्या संख्येने हजर राहिलेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. हा शिवसेनेचा आवाज थेट शिवाजी पार्कात पोहोचू द्या, असे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सभेला उद्देशून आवाहन केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील शिंदे गटाकडून आयोजित सभेत कदम यांनी ठाकरे कुटुबींयांतील फूट आणि सत्तेसाठी कार्यकर्त्यांना पुढे न येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या खेळींबाबत उघडपणे आरोप केले. शिवाजी पार्कवरील मेळावा हा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील निहार बिंदूमाधव ठाकरे न्यायालयात शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे आणि बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दस-या मेळाव्याला हजेरी लावली. बिंदूमाधव ठाकरे स्वर्गवासी झाले. चुलत बंधू राज ठाकरे यांचाही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा नाही. जे आपल्या कुटुंबांचा सांभाळ करु शकले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचे सांभाळ कसा करणार, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला. कुटुंब सांभाळता आले नाही तर कुटुंबप्रमुखाची भाषा करु नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
( हेही वाचा: शिवसेना आम्ही नव्हे, तुम्ही संपवली; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात )
उद्धव ठाकरे यांना कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही. या कार्यकर्त्यांना संपवण्याची निती उद्धव ठाकरेंकडे आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जिल्हाप्रमुखांच्या पदाचा त्यांनी राजीनामा मागितला. या घटनेचा मी साक्षीदार आहे. गुलाबराव पाटील यांना व्यासपीठावरील भाषणाला उद्धव ठाकरे यांनी बंदी आणली. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली. संभूराज देसाई यांना फोन करुन एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असे सकाळीच उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन कळवले. एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांकडून खात्मा झाला तरीही चालेल परंतु त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देऊ नका, असा उद्धव ठाकरे यांना हेतू आहे. मला संपवण्यामागे उद्धव ठाकरे यांनी कूरघोड्या केल्या. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्कावर, शष्णमुखानंद सभागृहातील मला भाषण करण्यास उद्धव ठाकरे यांनी मज्जाव केला. मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही उद्धव ठाकरे यांनी मनाई केली होती. उद्धव ठाकरेंना स्वतःपेक्षा मोठा झालेल्या नेत्याला संपवण्यात रस आहे. ठाकरे गटातून ५० आमदार जाण्यामागील कारणांमध्ये उद्धव ठाकरे यांची आडमुठी भूमिका कारणीभूत असल्याचा आरोपही कदम यांनी केला.
रुग्णालयात बसून मला संपवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न
रुग्णालयात बसून मला आणि माझ्या मुलाला संपवण्याच्या कामात उद्धव ठाकरे मग्न होते. कोरोनाकाळात मुख्यमंत्री पद स्वतःकडे असूनही अभावानेच उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले. मंत्रालयात बसून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आर्थिक रसद पुरवली. शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरु होते. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला ऐकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नव्हता. दुसरीकडे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना उद्धव ठाकरे मला आणि माझ्या मुलाला संपवण्याकडे लक्ष देत होते. बुडणारा स्वतःला वाचणव्यासाठी हालचाल करतो त्यामुळे आम्हांला गद्दार म्हणू नका. आम्ही क्रांती घडवल्याचेही कदम आपल्या भाषणात म्हणाले
Join Our WhatsApp Community