दीक्षाभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु आणि दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा लवकरच मंजूर करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते बुधवारी नागूपर येथील दीक्षाभूमीवर 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात बोलत होते.
मविआच्या काळात 40 कोटी रुपये बॅंक खात्यातच राहिले- फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. चाळीस कोटी रुपये एॅडव्हान्स म्हणूनही दिले होते. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात 40 कोटी रुपये बॅंक खात्यामध्येच राहून गेले. त्यातील दमडीचाही वापर विकास कामांसाठी होऊ शकला नाही. असे फडणवीस म्हणाले.
( हेही वाचा: बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजायचे, त्यांना तुम्ही घरघडी समजलात! )
190 कोटींचा नवा आराखडा लवकरच मंजूर होईल
आता दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणखी निधीची गरज असून 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा पुढील पंधरा दिवसात मंजूर करु असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुधवारी संध्याकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीकडून भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र ऐनवेळी पाऊस आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली मोठ्या संख्येने आलेले लोक घरी परत गेले. जे लोक दीक्षाभूमीवर उपस्थित होते त्यांनी आडोशाला जात भाषण ऐकले.
Join Our WhatsApp Community