उच्च न्यायालयाचे आदेश झुगारणारे भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते ताब्यात

153

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेले भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी गुरुवारी नागपुरातील बेझनबाग परिसरात सभा आयोजित केली होती. या सभेला परवानगी नाकारत परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. तसेच मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा,बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, राष्ट्रीय मागासवर्गीय मोर्चा, भारतीय युवा बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय मायनॉरीटी मोर्चा तसेच सर्व संघटना यांची एक भव्य अशी रॅली 6 ऑक्टोबरला नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर काढण्याची योजना आखली होती. त्यासंदर्भात विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क करून कार्यकर्त्यांना एकत्र केले जात होते. त्यांतर्गत 24 सप्टेंबर रोजी अमरावती येथे भारत मुक्ती मोर्चाचे गौरव किटूकले यांनी पत्रकार परिषद घेऊन 6 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील कामठी मार्गावरील बेजन बाग मैदान चौकाचून रॅली काढून महाल परिसरातील संघ मुख्यकार्यालवर जाण्याची आंदोलकांची योजना होती. परंतु, या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परवानगी नाकारली होती.

( हेही वाचा: “आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजप नेते राम कदम आक्रमक )

कलम 144 लागू, कार्यकर्ते अटकेत 

उच्च न्यायालयाने रॅलीला परवानगी नाकारल्यानंतरही भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम बेझनबाग परिसरात गुरुवारी सभा घेणार होते. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात सकाळपासून मोठा बंदोबस्त लावत सभेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बहुजन क्रांती असे या नाव देण्यात आलेल्या या मोर्चाला उच्च न्यायालयाने आणि पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही मोर्चाची तयारी चालवल्यामुळे पोलिसांनी परिसरात 144 कलम लावून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.